एजुकेशनल एंड्राइड आप्स

📱📱📲Ⓜ🅰🅿📱📲📱

स्वतःचे अँप्स बनवण्यासाठी वापरता येतील असे सोप्पे टूल्स

 आजचे सर्व महाजाल अँप्स नी व्यापून टाकलय जिकडे पहावे तिकडे अँप्स ची चर्चा असते.कोणत्याही साईट पेक्षा अँप्स हे जास्त सोपे वापरण्यास अतिशय सोयीचे ठरतात. भारतात शिक्षक शिक्षकांना उपयोगी पडतील असे अँप्स बनवत आहेत देशात इरफान नावाच्या शिक्षकाच्या अँप्स ची चर्चा होते त्याबरोबरच महाराष्ट्रातील बालाजी जाधव सरांच्या अँप्स ची दखल गूगल सारखी आंतरराष्ट्रीय कंपनी घेते.शिक्षकांकडे प्रचंड कल्पक कल्पना असतात त्याला मूर्त रूप देण्याकरता अँप्स फार मोठी भूमिका बजावतात हे अँप्स कसे बनवता येतात या साठी काही वेब टूल्स आहेत त्याची माहिती आपण घेणार आहोत.

 हे टूल्स वापरने अतिशय सोप्पे आहे कारण हे टूल्स वापरून अँप्स तयार करताना कोणतीही कोडींग language येणे आवश्यक नाही कारण हे सर्व टूल्स readymade टेम्प्लेट पुरवतात अँप्स बनवणाऱ्याला फक्त माहिती चित्रांचा संग्रह असला की चांगले एप्प तयार करता येतील.
चला तर मग पाहू काही educational अँप्स creating प्लॅटफॉर्मस

📲1- Appmakr



सर्व टूल्स मधील सर्वात चांगले अँप्स तयार करणारे प्लॅटफॉर्म आहे .याचा वापर करून तुम्ही अगदी सोप्प्या पद्धतीने एप्प तयार करू शकता व इतरांसोबत ही अँप्स share सुद्धा करू शकता.
यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयानुरूप इमेजेस व्हिडिओस ऑडिओ podcasts html स्निप्पेट्स ऍड करता येतात त्याने तुमचे एप्प अगदी प्रोफेशनल एप्प सारख कॅस्टमटीझ करता येते.

📲2- App Inventor 



हे एक अतिशय लोकप्रिय एप्प मेकिंग टूल आहे हे ह्याच 2 रं version अतिशय उपयोगी एप्प मेकिंग टूल म्हणून नावाजले आहे. ह्या टूल चा वापर करून तुम्ही काही क्लिक मध्ये एक सुंदर एप्प तयार करू शकता. ह्यात असंख्य tutorials दिले आहेत ज्याचा वापर करून तुम्ही एप्प अधिक उत्तम कसे करता येईल याची माहिती घेऊ शकता. या टूल्स च्या असंख्य community user आहेत जे advanced टिप्स पण देतात.

📲3- iBuildApp



हे एक असे टूल्स आहे ज्यात दोन्ही अँड्रॉइड व ios ऑपरेटिंग सिस्टिम वर चालतील असे अँप्स तयार करता येतात. अँप्स प्रोमोट करण्यासाठीचे advanced features यात दिसून येतात.ज्यात qr codes social मीडिया व एमबेडेड लिंक्स सुद्धा आहेत.

📲4. appsgyeser.com

 या व्यतिरिक्त appsgyser सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे व याची माहिती शिक्षकांना आहे.यात सुद्धा readymade टेम्प्लेट चा खजिना आहे व section नुसार अँप्स बनवू शकतो

📱Technology for teachers✒

✏आनंद बालाजी आनेमवाड✒

📮पंचायत समिती डहाणू, जिल्हा पालघर

📞9890697966
📱📲📱Ⓜ🅰🅿📱📲📱मित्रांनो
आज आपण पाहूयात इलर्निंग कंटेंट तयार करण्यासाठी एक नवीन सॉफटवेअर
Microsoft Learning Content DEvelopment Software
थोडक्यात LCDS.
LCDS डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://www.microsoft.com/en-in/learning/lcds-tool.aspx
साईट वरुन डाऊनलोड करण्यासाठी आपणाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण हे टूल

डाऊनलोड करु शकतो.
यात हिंदी इंटर फेस सुध्दा आपल्याला उपलब्ध आहे.
आपल्याला हवे ते इंग्रजी किंवा हिंदी सॉफटवेअर डाऊनलोड केल्यानंतर ते पी सी वर इंस्टॉल करा.
आता आपल्याला डेस्कटॉप वर LCDS चा आयकॉन दिसेल, ओपन केल्यानंतर आपल्यासमोर एल सी डी एस

चे होम स्क्रीन ओपन होईल.
यात डाव्या बाजूला आपल्याला कोर्स चे स्ट्रक्चर दिसेल तर उजव्या बाजूला टॉपिक संपादित करता येईल.
New मध्ये जाऊन नवीन इ लर्निंग कोर्स किंवा लर्निंग स्नॅक असे दोन ऑप्शन आपल्याला दिसतील. इ

लर्निंग कोर्स हे पूर्ण पुस्तक असे शकते तर लर्निंग स्नॅक एका घटकासाठी आपल्याला जेव्हा इंटरॲक्टीव्ह कंटेंट

तयार करायचे तेव्हा उपयोगी पडते.
यापैकी कुठलेही एक ऑप्शन निवडा.
आता एक नवीन विंडो ओपन होईल यात आपल्याला कोर्स चे नाव टाकावे लागेल.
यात कोर्स चे नाव टाकून ओके क्लिक करा.
डाव्या बाजूला कोर्स स्ट्रक्चर मध्ये आपल्याला कोर्स चे नाव दिसेल व त्याखाली टॉपिक दिसतील
आता क्रमाने आपण टॉपिक इडीट करु शकतो.
पहिला टॉपिक निवडा
मधल्या बार मध्ये आपल्याला टॉपिक चे नाव टाकावे लागेल
त्याखाली एक ॲरो चे चिन्ह आहे. त्यावर क्लिक केले की आपल्याला जी ॲक्टीव्हीटी टॉपिक मध्ये निवडायची

आहे ती निवडता येते.
यात.
Text and Picture
यात घटक समजावून सांगण्यासाठी एका बाजूला टेक्स्ट व दुसऱ्या बाजूला इमेज दिसते.
Adventure Activity
यामध्ये आपल्याला क्लिक केलेल्या चॉइस वरुन ठराविक पेज वर जाता येते.
Sort Game
यात दोन कॅटॅगरीज असतात. दिलेले शब्द कमीत कमी वेळात वर्गीकरण करायचा खेळ आपण डीझाईन करु

शकतो.

Tile Game
यामध्ये प्रत्येक टाईल वर एक ट्रू स्टेटमेंट तर एक चुकीचे स्टेटमेंट असते. बरोबर उत्तर निवडून सबमिट

करायचे.

Card Flip
यात प्रत्येक कार्ड वर एक स्टेटमेंट दिलेले असते. स्टेंटमेंट बरोबर असेल तर विद्यार्थ्यांनी सबमिट करायचे

आहे.

Animation
या प्रकारात आपल्याला ॲनिमेशन कोर्स मध्ये टाकता येते त्याचबरोबर ऑडीओ चे ट्रान्स्क्रीप्ट ही टाकतो येते.
Demonstration
यात चित्र, टेक्स्ट, व ॲनिमेशन व ट्रान्स्क्रीप्ट असे चार एकाच पेज वर कंपोज करता येतात.

Multiple Choice
या प्रकारात आपल्याला मल्टीपल चॉईस प्रश्न तयार करता येतात.
LCDS मध्ये कोर्स तयार करताना आपल्याला उजव्या बाजूला वर Media Folder नावाचे ऑप्शन

दिसेल. या फोल्डर मध्ये आपल्याला आपल्या कोर्स साठी लागणारे इमेजेस , ॲनिमेशन्स कॉपी करुन घ्यायचे

आहेत म्हणजे ते आपल्याला कोर्स मध्ये वापरता येईल. इमेज साठी png फॉर्मेट आपल्याला वापरावा

लागतो.
सर्व पूर्ण झाल्यावर आपल्याला Publish वर क्लिक करायचे आहे आपला कोर्स झिप फॉर्मट मध्ये

पब्लीश होईल . कोर्स पाहण्यासाठी ही झिप फाईल अनझीप करुन घ्या. त्यातील Index ही फाईल

Internet Explorer मध्ये ओपन करा. आपला इ लर्निंग घटक आपल्याला दिसू लागेल.
यासाठी सिल्वरलाईट प्लगील डाऊनलोड असावे लागेल.
काही कारणांमुळे इतर ब्राऊझर मध्ये हे कोर्स व्यवस्थित दिसत नाहीत. पण इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये

व्यवस्थित दिसतात.

हे सॉफटवेअर फ्री आहे व अतिशय चांगल्या प्रकारचे कंटेंट आपण तयात करु शकतो.
नक्की वापरुन पहा.

पुढच्या भागात नवीन सॉफटवेअर बघूत
Till Then
hAppy LearNIng ......
~ Anil Sonune
MIEE